एसटीच्या मासिक, त्रैमासिक पासला मुदतवाढ – परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई, दि. १६ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे,  ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था  एसटी महामंडळाने केली आहे,अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली. दि.२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परिणामस्वरूप २२ मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रेमासिक पास काढले होते परंतू एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री श्री. परब यांनी म्हटले आहे.

Read more

लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल

राज्यात ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक मुंबई दि.१६- विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात ४८०  गुन्हे दाखल झाले आहेत,  २५८ जणांना अटक करण्यात

Read more

पत्रकारितेतील वैभव गेले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्येष्ठ पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्र्यांना शोक मुंबई, दि: १६ :  ज्येष्ठ पत्रकार आणि संयुक्त

Read more

राज्यपालांनी घेतली रश्मी ठाकरे यांची सांत्वनापर भेट

मुंबई दि:१६ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची कलानगर वांद्रे येथे सांत्वनापर भेट घेतली. रश्मी

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 1211 रुग्णांवर उपचार सुरु औरंगाबाद, दि.16 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 2918

Read more