सरळसेवा भरती, पदोन्नतीसंदर्भातील राखीव प्रवर्ग बिंदूनामावली तातडीने अंमलात आणा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचना

मुंबई दि. १४- महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरती आणि पदोन्नतीकरीता असलेल्या १०० पदांच्या बिंदूनामावलीत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त

Read more

एसटीच्या मासिक, त्रैमासिक पासला मुदतवाढ – परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई, दि. १६ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे,  ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था  एसटी महामंडळाने केली आहे,अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली. दि.२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परिणामस्वरूप २२ मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रेमासिक पास काढले होते परंतू एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री श्री. परब यांनी म्हटले आहे.

Read more

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या अभ्यासासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

मुंबई दि.१२ जून : राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांत इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व

Read more