एमपीएससीची रविवारी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

नव्या तारखेस होणाऱ्या परीक्षेस सध्याचे पात्र उमेदवार बसू शकणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. ९ : – महाराष्ट्र लोकसेवा

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

मुंबई दि. २५ :  कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Read more

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अनिर्बंध वावर रोखणे गरजेचे – मुख्यमंत्री

पावसाळा, कोरोना, मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांचा मुख्यमंत्र्यांकडून  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा मुंबई दि २९: कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात

Read more

वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल स्थापन

मुंबई, दि. 24 : कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या

Read more

एसटीच्या मासिक, त्रैमासिक पासला मुदतवाढ – परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई, दि. १६ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे,  ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था  एसटी महामंडळाने केली आहे,अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली. दि.२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परिणामस्वरूप २२ मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रेमासिक पास काढले होते परंतू एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री श्री. परब यांनी म्हटले आहे.

Read more