वैजापुरात ईद-उल-फित्र (रमजान ईद) उत्साहात साजरी

वैजापूर ,२२ एप्रिल  / प्रतिनिधी :-वैजापूर शहरात ईद- उल-फित्र (रमजान ईद) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील ईदगाह तसेच विविध मशिदीत मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.

आ.रमेश पाटील बोरणारे ,माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी,  तहसीलदार राहुल गायकवाड,पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे , शिवसेना तालुकाप्रमुख राजेन्द्र पाटील साळुंके, शहर प्रमुख पारस घाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, वैजापूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष  विशाल संचेती, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, संजय पाटील निकम, आप्पासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, देवीदास वाणी, नगरसेवक  डॉ,निलेश भाटिया, दशरथ  बनकर, शैलेश चव्हाण, राजेश गायकवाड, ज्ञानेश्वर टेके, अमोल बोरनारे, संजय बोरनारे, प्रशांत शिंदे, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, जितेंद्र चापानेरकर आदींनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

उपनगराध्यक्ष साबेरखान, सदर काझी हाफीजोद्दीन,  मजीद कूरेशी, मलिक काझी, इम्रान कूरेशी, हाजी अकिल सेठ यांच्यासह मस्जिद इमाम, नादीम व सर्व मुस्लींम बांधवांना उपस्थितांनी ईदच्या शुभेच्छा  दिल्या. ईदगाहमध्ये काँक्रीटीकरण कामासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.रमेश पाटील बोरणारे यांचे मुस्लिम समाजातर्फे काझी हाफीजोद्दीन यांनी यावेळी आभार मानले.