डागपिंपळगावच्या जयश्री पवार हिची आयटीबीपी अर्धसैनिक दलात निवड ; सेवानिवृत्त सैनिक – अर्धसैनिक आघाडीतर्फे सत्कार

वैजापूर,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथील जयश्री जालिंदर पवार या विद्यार्थिनीची आयटीबीपी अर्धसैनिक दलात निवड झाली. माजी सैनिक – अर्धसैनिक आघाडी वैजापूर तालुकातर्फे जयश्री पवार हिचा बुधवारी येथे सत्कार करण्यात आला.

संत सावता मंदिर, माळीगल्ली वैजापूर येथे जयश्री पवार हिचे सुमनताई गायकवाड व नम्रता गायकवाड यांच्याहस्ते औक्षण करून तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी माजी सैनिक व अर्धसैनिक आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा   सीआरपीएफ चे सेवानिवृत्त मेजर गौतम गायकवाड, सीआरपीएफचे सेवानिवृत्त इन्स्पेक्टर सोपान देवकर, बीएसएफ चे मेजर बाळू मोरे, माजी सैनिक संघटनेचे संदीप जगधने आदी उपस्थित होते.