वैजापूर शहरात भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन

वैजापूर, २६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-भारतीय संविधान दिनानिमित्त शहरातील सर्व थरातील नागरिकांनी शनिवारी (ता.26) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याला प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, राजेश गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. त्या नंतर भारतीय घटनेच्या उद्धेशिकेचे वाचन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. या प्रसंगी जयप्रकाश बोरगे, दिलीप अनर्थे, संजय बोरनारे, मंडळ अधिकारी अशोक तांबूस, कैलास भाटे, शिवा थोरात, रुद्रा शेजवळ, विलास म्हस्के, कैलास बागुल, दीपक बरकसे, ज्ञानेश्वर सिरसाट, बाबासाहेब जगताप आदी उपस्थित होते.