श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी वैजापूर केंद्रात विविध कार्यक्रम

वैजापूर ,२३ मार्च / प्रतिनिधी :-श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी चरित्र सारामृतच्या 21 अध्यायचे  वाचन गुरुवारी (ता.23) शहरातील पाचशे भक्त भाविकांनी केले. यात महिलांचा सहभाग जास्त  होता. ग्रंथ वाचन कविता पुरी यांनी केले. त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. भक्त भाविकांनी आपल्या घरून जेवणाचे डबे आणून “मांदयाळी” भोजनाचा व महाप्रसाद एक दुसऱ्या भक्तांना वाटून आनंद घेतला. रांगोळी ही या निमित्ताने काढण्यात आल्या हत्या. अत्यंत प्रसन्न व आनंदी वातावरणात केंद्रात भक्त भाविकांनी प्रकट दिन साजरा केला. केंद्रात माजी नगरसेवक लिमेश वाणी, सुरेश आलूले  यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यांना अरविंद तुपे, रोहित गुळसकर, सी.के.पवार, धोंडीरामसिंह राजपूत, अनिकेत सोनवणे, नवनाथ शिंदे, श्रीमती आलूले यानी सहकार्य केले.