लतादिदी अमर रहे, शिवसेनेतर्फे गीतमय श्रद्धांजली

‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ ने लता दिदींच्या स्मृतींना उजाळा ; रसिक प्रेक्षकांचा दाटून आला कंठ 

औरंगाबाद,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जगभरात आपल्या सुमधूर आवाजातून लोकांची मने जिंकणाऱ्या, स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह देशाचे मोठे नुकसान झाले. त्यांची आठवण म्हणून शिवसेनेतर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या गीतातून आदरांजली वाहण्यात आली.

मंगळवार, ८ रोजी सायंकाळी  वाजता तापडिया नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. लतादीदीचे चाहते, रसिक, संगीतप्रेमी जनतेने  संगीतमय आदरांजली मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लता दिदींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही यावेळी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.याप्रसंगी सरला शिंदे प्रस्तुत आलाप ग्रुप  लतादिदींचे अजरामर गीते सादर केली.

Displaying DSC_1313.JPG

शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख तथा आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंह राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ,युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख,  उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, संतोष जेजुरकर, बाप्पा दळवी,  जिप सभापती किशोर बलांडे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, माजी नगरसेवक मोहन मेघावाले, सचिन खैरे, जगन्नाथ बैसये,  महिला आघाडीच्या संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनीता देव, उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, नलिनी बाहेती, सुनंदा खरात, विधानसभा संघटक लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे, शहर संघटक भागूबाई शिरसाठ, विद्या अग्निहोत्री, प्राजक्ता राजपूत, शिवअंगणवाडीच्या मंजुषा नागरे, माजी नगरसेविका शिल्पा वाडकर, उपशहरसंघटक राज्यश्री राणा, मीना पाटील, विजया त्रिभुवन, सुषमा यादगिरे, शिल्पा वाडकर, मंजुषा नागरे, जयश्री पोफळे, पुष्पा राजे, मीरा पाटील, वनिता ठाकूर, रेणुका जोशी, देवयानी सिमंत, सुकन्या भोसले, छाया जाधव, मीना पाटील, शारदा घुले, अनिता खोंडकर,  स्मिता सूर्यवंशी, गौरा जाटवे, उपशहर प्रमुख जयसिंग होलिये, अनिल जैस्वाल, हिरालाल सलामपुरे, विजय सूर्यवंशी,  ऍड. राजू पहाडिया, राजू परदेशी, गायक बजरंग विधाते, राजेश सरकटे, प्रमोद सरकटे, नितीन सरकटे,संजय सरकटे, संतोष खोडकर, युवसेनेचे गणेश तेलोरे, रवी गांगे, मनीष मगरे, अरविंद कामतीकर, शिवम पांडे, राहुल सोनवणे, प्रतीक अंकुश,अक्षय पाथरीकर, अथर्व सूर्यवंशी आदींसह संगीतप्रेमी जनता उपस्थित होते.

 स्व. लतादीदी यांच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पण करून राज्यमंत्री सत्तार यांनी लतादिदींच्या देदिप्यमान कारकिर्दीवर भाष्य केले आणि राज्यमंत्री सत्तार यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या दोन ओळी सादर केल्या.

कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लतादीदी आणि छायाचित्रकार भाऊराव खैरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, लतादीदी आणि आमचे कौटुंबिक संबंध होते. वडील भाऊराव खैरे यांनी लतादीदींचा सुंदर फोटो काढला होता. तो आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये मोठा करून लावलेला आहे. त्यानंतर गायिका सरला शिंदे आणि त्यांच्या संचाने लतादीदींच्या ‘वंदे मातरम’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘मोगरा फुलला’, ‘तुम ना जाने हम कहा’, ‘तू जहाँ जहाँ चलेगा’, ‘मोहें भूल गये सावरिया’, ‘रसिक बलमा’, ‘लग जा गले’, ‘ऐरणीच्या देवा तुला’ ने मजसी ने परत मातृभूमीला… सागरा प्राण तळमळला….एक प्यार का नगमा है….तेरे बिना जिंदगी से शिकवा… वो भोली दास्ता… सोला बरस की….सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…यारा सिल्ली सिल्ली…अशी एकापेक्षा एक सरस गिते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सरला शिंदे यांना अजय तायडे, राजू तायडे, राजेश देहाडे, राहुल जोशी, जितेंद्र साळवी, निखिल प्रधान, शैलेश निसर्गंध, अभिजीत शिंदे यांनी साथ दिली.