विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

वैजापूर,२३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी वैजापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

ठोंबरे कुटुंबियांनी दानवे यांचे स्वागत व सत्कार केले. यावेळी दानवे व ठोंबरे यांच्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रमेश पाटील सावंत, नंदकिशोर जाधव, विठ्ठल डमाळे, प्रवीण सोनवणे, अक्षय साठे,राजू गलांडे आदी उपस्थित होते.