औरंगाबाद जिल्ह्यात 146 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 40707 कोरोनामुक्त, 802 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 24 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 110 जणांना (मनपा 98, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 40707 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 146 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42646 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1137 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 802 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा( 124 ) मुकुंदवाडी (1), सारावैभव जटवाडा रोड (1), मयुर पार्क (1), शिवाजी नगर (2), पडेगाव (1), ज्योतीनगर (1), ब्ल्यू बेल कॉलनी (2), बीड बायपास (3), प्रतापनगर, उस्मानपुरा (1), दिशा संस्कृती, पैठण रोड (4), शिवशंकर कॉलनी (1), पदमपुरा (1), शहानूरवाडी (1), दिवाण देवडी (1), सातारा परिसर (1), नक्षत्रवाडी (1),लोकमत हायकोर्ट (2), आयनॉक्स प्रोझोन (1), बजरंग कॉलनी (1), एस.बी.आय बँक, सिडको (1), ठाकरे नगर (1), बजरंग चौक (2), पार्वती नगर (1), एन-3, सिडको (3), एन-11, नवजीवन कॉलनी (2), एन-9 श्रीकृष्ण नगर (1), राजाबाजार (1), इटखेडा (1), नाथ नगर (1), एस.आर.पी.एफ. कॅम्प (1), आय.जी.टी.आर. (1), विश्वभारती कॉलनी (1), सेंटफ्रांसिस हायस्कूल (1), गादिया विहार (1), शिवज्योती कॉलनी (1), एन-11, हडको (1), अमराई (1), अन्य (75),

ग्रामीण (22) वडगाव (1), सिल्लोड (1), लासूर स्टेशन (1), अन्य (19)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत रांजणगाव शेणपुंजी येथील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.