अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपीकांची केंद्रीय पथकाकडून पहाणी

Image may contain: 4 people, people standing, sky, outdoor and nature

जालना, दि.21 – ऑक्टोबर महीन्यात तीन ते चार वेळा झालेल्या अतिवृष्टीने बाधित शेत व शेतपिकांची आज दि.21 डिसेंबर रोजी केंद्रीय पथकातील अधिकारी संचालक कृषी मंत्रालय ,नागपुर आर.पी सिंग ,अधिक्षक अभियंता निरीक्षण केंद्र ,नागपुर एम.एस.सहारे यांनी बदनापुर तालुक्यातीळ मौजे वाकुळणी ,बाजार वाहेगाव व रोषणगांव येथील शेतीस प्रत्यक्ष भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी प्रसंगी आमदार नारायण कुचे,माजी आमदार,संतोष सांबरे ,जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिंषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा , उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसिलदार छाया पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.

Image may contain: 2 people, people standing and outdoor

यावेळी पथकाने बदनापुर तालुक्यातील वाकुळणी येथील शेतकरी बाळासाहेब वाकुळणीकर यांच्या शेतातील कापुस पिकाची पहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. बाजार वाहेगाव येथील शेतकरी संकेत नारायण काळे यांची अतिवृष्टी मध्ये क्षतीग्रस्त झालेल्या विहीरीची पहाणी केली तर बाजार वाहेगाव शेतकरी विष्णु जीजा काळे यांच्या शेतातील मोसंबी बागेची पाहणी केली .तसेच रोशनगाव येथील शेतकरी निवृत्ती आसाराम खरात यांच्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी करुन त्यांच्या समस्या जाणुन घेतली. जालना तालुक्यातील नंदापुर येथील द्राक्ष बागेची पाहणी करत जालना शहरातील जिल्हा मार्केट कमेटी येथे भेट देऊन शेतकऱ्यांकडुन धान्य बाजारात सोयाबीन,मका,मुग,कापुस आदी आवाक व दरा बाबत ही पथकाने माहिती जाणून घेतली.