आणीबाणीत तुरुंगवास झालेल्या वैजापूरच्या आठ जणांना सरकारचे मासिक मानधन मंजूर

भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांच्या प्रयत्नाला यश 

वैजापूर ,९ जानेवारी  / प्रतिनिधी :- देशात आणीबाणी काळात वैजापूरातील आठ व्यक्तींना तुरुंगवास झाला होता. या तुरुंगवास भोगलेल्या आठ व्यक्ती किंवा त्यांच्या वारसांना सरकारने दर महिन्याला मानधन मंजूर केले असून हे मानधन मिळण्यास सुरुवात झाली आहे. 

हे मानधन मिळवून देण्यासाठी वैजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी कागदपत्रे पूर्तता करणे, शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करणे असे अथक प्रयत्न केले व या आठही व्यक्तींना शासनाकडून मानधन सुरू करून दिले. त्यामुळे या आठही व्यक्तींतर्फे सोमवारी (ता.09) डॉ.दिनेश परदेशी व धोंडीरामसिंह राजपूत यांचा सत्कार  नारायण लाडवाणी यांनी केला. डॉ.दिनेश परदेशी यांनीही या आठही व्यक्तींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. नारायण लाडवानी, शेख हुसेन, लीलाबाई अनर्थे, सत्यभामाबाई पुणे, सोनुबाई शेलार, रुख्मिनी शिंदे, कमला श्रीवास्तव, यमुनाबाई जाधव यांचा समावेश आहे, याप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप सिंह राजपूत, भास्कर मतसागर यांची उपस्थिती होती.