मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक विधान समाजकंटकाविरुद्ध कारवाई करा-वैजापूर मुस्लिम समाज

वैजापूर ,१२ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- त्रिपुरा येथे काही समाजकंटकांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी चुकीचे व अवमानकारक उदगार काढून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल वैजापूर येथील मुस्लिम  समाजाच्यावतीने शुक्रवारी (ता.12) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. समाजकंटकांविरुद्ध कारवाईची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, त्रिपुरा येथे काही समाजकंटकांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर व मुस्लिमधर्मियांच्या धर्मग्रंथाविषयी चुकीचे व अवमानकारक उदगार काढून समस्त मुस्लिम  समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.तसेच मशिदींचेही नुकसान करून धर्मग्रंथाचे अपमान केले आहे. मोहम्मद पैगंबर व इस्लाम धर्माविषयी चुकीचे व अवमानकारक उदगार काढून मुस्लिम  समाजाच्या भावना दुखावणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.
निवेदनावर हाजी सय्यद जुबेर सहाब, राफे हसन, एम.के.बेग,एन.आर.शेख,सईद अली, मझहर बेग, सय्यद यासर,इफ्तेखार अहमद,सय्यद मोहसीन,अकबर कादरी,मोहम्मद रिझवान,मोईन अली आदींच्या सह्या आहेत.