महागाई विरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा आज आक्रोश मोर्चा

May be an image of 5 people, people standing and indoor

औरंगाबाद,१२नोव्हेंबर /प्रतिनिधी:- सातत्याने वाढत्या महागाईच्या भस्मासुराने सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून मोदी सरकारने २०१४ मध्ये  महागाई विषयी केलेल्या घोषणा हवेतच विरल्या असून सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तूच्या दरवाढीने त्रस्त जनतेचा संताप शिवसेना रस्त्यावर उतरुन  व्यक्त करणार आहे.शनिवार दि. १३ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली  मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी  कळविले आहे.

May be an image of 10 people, people sitting and people standing


या मोर्चात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मंत्री संदिपान भुमरे,मंत्री  अब्दुल सत्तार, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार मनिषा कायंदे, आमदार सर्वश्री प्रदिप जैस्वाल, संजय शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपुत, युवा सेनेचे विस्तारक तथा उपसचिव मंदार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिैती राहणार आहे. शनिवारी सकाळी १०:०० वाजता हा मोर्चाची क्रांतीचौक येथुन सुरुवात होऊन गुलमंडी येथे समारोप होईल. या महागाई विरोधी आक्रोश मोर्चा मध्ये सर्व शिवसैनिक – महिला आघाडी – युवासेना- इतर अंगीकृत संघटनांनी आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे ,जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी ,माजी महापौर नंदकुमार घोडेले, सहसंपर्क प्रमुख त्रिंबक तुपे, उपजिल्हाप्रमुख बाबसाहेब जगताप, राजु राठोड, अवचित वळवळे, भाऊ सांगळे, अविनाश पाटील, संतोष काळवणे, अशोक शिंदे, राजेंद्र राठोड, विनोद बोंबले, किशोर अग्रवाल, कृष्णा डोणगांवकर, संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, बप्पा दळवी, जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुनिता आऊलवार, सुनिता देव, जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, राखी परदेसी, समन्वयक कला ओझा, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशिल खेडकर, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, केतन काजे, राजु वरकड, सचिन वाणी, सुभाष कानडे, आबा काळे, देविदास लोखंडे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. जीजा कोरडे, कृष्णा पवार, अण्णा लबडे, हनुमंत भोंडवे, उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश खैरे, जिल्हायुवा अधिकारी हनुमान शिंदे, मचींद्र दवेकर, किशोर चौधरी, कैलास जाधव यांनी केले आहे.