महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल -डिझेल यांचे दर कमी करण्यासाठी हातभार लावावा,भाजपाची मागणी

औरंगाबाद,१२नोव्हेंबर /प्रतिनिधी:- केंद्र सरकारने ज्याप्रमाणे पेट्रोल -डिझेल यांचे दर कमी करून सामान्यांना दिलासा दिला, त्याच धर्तीवर आता महाविकास आघाडी सरकारने देखील दर कमी करण्यासाठी हातभार लावावा यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

May be an image of 7 people, people sitting and people standing

केंद्राने शुल्क कमी केल्यानंतर १७ राज्यांनी पुढाकार घेत शुल्कात कपात करून नागरिकांना दिलासा दिला. पण महाराष्ट्र राज्य सरकार मात्र याविषयी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. व्हॅट आणि सेस या दोन्ही गोष्टींमध्ये कपात करून पेट्रोल वर किमान ५ तर डिझेल वर किमान १० रुपयांची सवलत मिळवून द्यावी अशी विनंती औरंगाबाद शहर भाजपा तर्फे करण्यात आली आहे.
याप्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर , सरचिटणीस राजू शिंदे, राजेश मेहता , शिवाजी दांडगे, जालिंदर शेंडगे, मनीषा भन्साळी, ताराचंद गायकवाड,अमृताताई पालोदकर, मनीषा मुंडे,सागर पाले,हफीज शेख, गोकुळ मलके, हाजी दौलतखान पठाण,शाकेर राजा, अशोक जगधने, छायाताई खाजेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते