शिर्डी संस्थान सीईओ नेमणूक :याचिकेची सुनावणी २ सप्टेंबरला

May be an image of 1 person

एका न्यायमूर्तींचे नॉट बिफोर मी चे आदेश 

औरंगाबाद ,२३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळासंदर्भातील याचिकांवर न्या. आर. एन. लड्डा यांच्यासह असणाºया द्विसदस्यीय खंडपीठासमोर नॉट बिफोर मी चे आदेश देण्यात आले. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडंपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांच्यासमोर सुनावणी झाली असता हा निर्णय देण्यात आला. दरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या नियुक्तीप्रकरणी दाखल अवमान याचिकेवर २ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कान्हूराज बगाटे आयएएस अधिकारी नसताना त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान  बगाटे यांची आयएएस केडर मध्ये पदोन्नती झाली. बगाटे यांच्या नेमणुकीबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशप्रमाणे सरळ नेमणुकीच्या  आयएएस अधिकाऱ्याची साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे आदेश १९ मार्च २०२१ रोजी दिले होते.  आजवर ५ महिने उलटूनही आयएएस न नेमल्यामुळे, याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांनी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग व विधी, न्याय विभाग यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने  प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे  यांनी काम पाहिले.