औरंगाबाद जिल्ह्यात151 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,पाच मृत्यू

जिल्ह्यात 35036 कोरोनामुक्त, 1287 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 24 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 247 जणांना (मनपा 160, ग्रामीण 87) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 35036 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 151 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37376 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1053 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1287 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 24 आणि ग्रामीण भागात 42 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (77) वाळूज एमआयडीसी (1), खामगाव, फुलंब्री (1), कन्नड (6), शरद पवार कॉलनी, कन्नड (1), चिकलठाण, कन्नड (5), वाकी, कन्नड (6), गणेश चौक, वाळूज (1), जानेफळ, वैजापूर (1), नायगाव (1) भोकरगाव, वैजापूर (2), नादरपूर, कन्नड (1), बजाज नगर (1), गंगापूर (4), जांभरगाव, वैजापूर (2), पैठण (6), साठे नगर, कन्नड (1), गणेशपूर फुलंब्री (1), औरंगाबाद (2), खुलताबाद (2), वैजापूर (32)

मनपा (50) राधा स्वामी कॉलनी (1), श्रीकृष्ण नगर (4), एन पाच सिडको (3), एन सात (1), एन नऊ (1), नागेश्वरवाडी (1), पडेगाव (1), छत्रपती नगर (1), प्रताप नगर (1), सिंधी कॉलनी (1), भोईवाडा (2), धनगर वाडा , हर्सुल (1), नारेगाव (1), शिवनेरी कॉलनी (1), संग्राम नगर (1), शुभम कॉलनी (1), संभाजी कॉलनी (1), राज नगर (2), गणेश नगर (1), एन चार सिडको (1), राजीव गांधी नगर (1), राम नगर (1), गारखेडा परिसर (3), समर्थ नगर (1), रोजाबाग (1), बीड बायपास (1), इटखेडा (1), स्वप्ननगरी (3), टीव्ही सेंटर (1), कांचनवाडी (1), काल्डा कॉर्नर (2), वेदांत नगर (1), जवाहर कॉलनी (1), पारिजात नगर, सिडको (1), पवन नगर (1), पहाडसिंगपुरा (1), मुकुंदवाडी (1), मिलिट्री हॉस्पीटल (1)

पाच कोरोनाबाधिताचा मृत्यू घाटीत समर्थ नगरातील 72 वर्षीय पुरूष, लोहगाव, पैठण येथील 57 वर्षीय स्त्री, एकता नगर, हर्सुलमधील 61 वर्षीय पुरूष, लेबर कॉलनीतील 40 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात टिळक नगरातील 89 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.