विविध योजनांचा निधी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य -केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

औरंगाबाद, दिनांक 24 : जिल्ह्यातील सोयगाव शहरातील विविध रस्त्यांचे सिमेंटिकरण, स्मशान भूमी विकास आदींसह विविध विकासकामांचे उद्घाटन केंद्रीय ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

केंद्राच्या विविध योजनांचा निधी शहराला उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असून सोयगाव शहराच्या विकासाला प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष कैलास काळे, विजय औताडे, सांडू पाटील लोखंडे, पुष्पाताई काळे, इद्रिस मुलतानी, सुरेश बनकर, गणेश लोखंडे, जयप्रकाश चव्हाण आदींची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर सोयगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन श्री. दानवे यांनी ग्रामस्थांशी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्रगतीपथावर असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, रस्ते विकास, पाणी पुरवठा, आदिवासी विकास आदी विविध योजनांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला