आयकर परतावा आणि लेखा परीक्षण अहवाल भरण्यासाठीच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020

कोविड -19 महामारीमुळे करदात्यांना वैधानिक आणि नियामक पालन  करणे  आव्हानात्मक होत असून सरकारने 31मार्च 2020 रोजी कर आणि इतर कायदे अध्यादेश  2020 अंतर्गत (काही तरतूदी शिथिल करुन, कर भरण्यासाठी  वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे. हा अध्यादेश बदलून आता कर आणि इतर कायदे अधिनियम  तयार केला आहे.

सरकारने या आधी 24 जून 2020 रोजी एका  अध्यादेशाद्वारे आर्थिक वर्ष 2019-20 (मुल्यांकन वर्ष 2020 -21) साठी आयकर भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली  म्हणुन जो  आयकर परतावा 31जुलै 2020आणि 31ऑक्टोबर 2020पर्यंत भरावयाचा होता तो 30नोव्हेंबर 2020पर्यंत भरणे आवश्यक होते. यामुळे लेखा परीक्षण अहवाल आणि कर परीक्षण अहवाल यांची तारीख  आयकर कायदा 1961(अधिनियम) यानुसार  नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली गेली होती.

करदात्यांना आयकर परतावा भरण्यासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून  आता असे ठरविण्यात आले आहे की, ही तारीख खालील नियमांनुसार आणखी वाढविण्यात आली आहे:

ज्या करदात्यांना (त्यांच्या भागीदारांसह) आपल्या खात्याचे लेखा परीक्षण करण्याची आवश्यकता आहे अशांसाठी ( अधिसूचनेद्वारे  मुदतवाढ देण्याआधी ही मुदत 31 ऑक्टोबर 2020 होती) ही तारीख 31 जानेवारी 2021पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ज्या करदात्यांना आपले आंतरदेशीय /निश्चित देशांतर्गत व्यवहारांचे अहवाल भरणे आवश्यक होते त्यांच्यासाठी ही तारीख  वाढविण्यात आली असून (जी  अधिनियमानुसार 30नोव्हेंबर 2020 होती)ती 31जानेवारी 2021पर्यंत केली आहे.

इतर करदात्यांसाठी  ही मुदत (ज्यांच्यासाठी ही मुदत अधिनियमानुसार मुदतवाढ देण्याआधी 31 जुलै 2020 होती 31डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

पर्यायाने  ज्यांना आपले  अधिनियमांतर्गत येणारे आंतरदेशीय /निश्चित देशांतर्गत व्यवहारांचे लेखा परीक्षण अहवाल भरावयाचे आहेत त्यांच्यासाठी   ही मुदत 31 डिसेंबर  2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

लहान आणि मध्यम करदात्यांना दिलासा देत, 24जून 2020 च्या अधिसूचनेत असलेली तारीख, जे करदाते स्वतःचे करमूल्यांकन स्वतःच करतात आणि ज्या करदात्यांची स्वकर मूल्यांकन मर्यादा 1लाख आहे ,अशा करदात्यांसाठी देखील मुदतवाढ दिली आहे. जे करदाते स्वतःचे कर मूल्यांकन करतात आणि ज्या करदात्यांना त्यांचे लेखा परीक्षण  करावे लागत नाही, अशा करदात्यांसाठी देखील मुदतवाढ दिली असून ती 31 जुलै 2020 वरून वाढवून 30  नोव्हेंबर  2020 करण्यात आली आहे आणि लेखापरीक्षणाची आवश्यकता असलेल्यांसाठी ती मुदत 31आँक्टोबर 2020 वरून 30  नोव्हेंबर  2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

जे करदाते स्वतःचे करमूल्यांकन स्वतःच करतात आणि ज्या करदात्यांना त्यांचे लेखा परीक्षण  करावे लागत नाही, ज्या करदात्यांची करमूल्यांकन मर्यादा 1 लाख आहे अशा करदात्यांसाठी देखील  ती 31जानेवारी 2021पर्यंत वाढविण्यात आली आहे आणि परीच्छेद 3(A)आणि  परीच्छेद 3 (B)  मधील करदात्यांसाठी ती 31जानेवारी 2021 पर्यंत आणि परीच्छेद 3 (C)यांच्यासाठी ती 31डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.या विषयीची अधिसूचना लवकरच जाहीर करण्यात येईल.