गावठी कट्ट्याच्या बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरून ७४ हजार ८५० रूपयांची लुट

जालना,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :- गावठी कट्ट्याच्या बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरून ७४ हजार ८५०  रूपयांची लुट केल्याची घटना शुक्रवारी २२ एप्रिलरोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जालना शहराजवळील दावलवाडी शिवारातील सारथी पेट्रोलपंपावर घडली. या घटनेमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे.दावलवाडी शिवारात अशोक भिकाजी चव्हाण (रा. अंबड चौफुली जालना) यांचासारथी पेट्रोल पंप आहे.

शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बदनापुरसाईडने एक पांढ-या काळ्या रंगाची विना क्रमांकाची स्पेन्डर गाडीवर एक इसमसारथी पेट्रोलंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला. त्याने अंगात काळ्या रंगाचाटी – शर्ट, आर्मी कंमाडोची पॅन्ट व तोंडाला काळा रूमाल गुंडालेला, काळाचष्मा व अंगाने सडपातळ हा इसम पेट्रोल पंपावर आला. त्याने ३० रूपयाचेपेट्रोल भरले. व स्प्लेंडर गाडी पुढे डिझेल पंपावर घेवून बोलत उभाराहिला.पेट्रोलपंपावर गर्दी संपल्यानंतर पेट्रोलपंपावर कर्मचारी शेख इरफान शेखहमीद व योगेश दोघे बाकड्यावर बसले. यावेळी सदर इसमाने चंदनझिरा किती लांबआहे, असे विचारले. त्यानंतर माझ्या पायाला काहीतरी डसत आहे, असे म्हणूनखाली वाकुन पॅन्ट वर करू लागला. व नंतर कमरेवरून पॅन्टमध्ये हात घालून एकसिल्व्हर रंगाचा गावठी गट्टा काढला. व त्याला दोन्ही हातांनी उघडले.कट्टा आमच्या दिशेने छातीवर लावला. शिवीगाळ करून,आमच्या दोघांच्या जवळील२ हजार,५००,१००, ५०,२० व १० रूपयांच्या नोटांची ७४ हजार ८५० रूपयेबळजबरीने काढून पोबारा केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. शहरीभागासोबत आता ग्रामीण भागातही  असे प्रकार घडत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.याबाबत पेट्रोल पंपाचा कर्मचारी शेख इरफान शेख हमीद रा. सेलगांव यांच्याफिर्यादीवरून सदरील अज्ञात इसमाविरूध्द बदनापुर पोलिस ठाण्यात गुन्हानोंद करण्यात आला. याप्रकरणाचा अधिक तपास भागवत पांडुरंग वाघ करीत आहे.