औरंगाबाद जिल्ह्यात 156 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 46287 कोरोनामुक्त, 602 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 18 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 52 जणांना (मनपा 43, ग्रामीण 9) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46287 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 156 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48135 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1246 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 602 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (133)सातारा परिसर (1),भाग्योदय नगर (1), शिवाजी नगर (1), वैजयंती नगर (1), साई नगर, देवळाई (1), चिकलठाणा (2), सिडको (3), हर्सूल, यासान नगर (1), ओरीयन अपार्टमेंट स्टेशन रोड परिसर (1), टि व्ही सेंटर (1),हर्सूल, जकात नाका (1),अयोध्या नगर, सिडको (1), घाटी परिसर (2), गारखेडा (2),पैठण एकतुणी (1),एन 11 हडको (1),सुभाषचंद्र बोस नगर (2), बेगमपुरा (1), गुरु सहानी नगर (2), एन-5 अनिरुध्द कॉलनी (1), बीड बाय पास (1), देवळाई परिसर (1), मयुर पार्क (1), जवाहर कॉलनी (2), सिडको (2), ज्योती नगर (2), बन्सीलाल नगर (2),राज नगर (1), पोर्णिमा बिल्डींग (1), म्हाडा कॉलनी (1), साकला गार्डन, हर्सूल (1), नवजीवन कॉलनी (1), उस्मानपूरा (1), एन-11 (1), जाधववाडी (1), भारतीय विद्यालय, हडको (1), एन-7 सिडको (1), सांवगी (2), सिडको-एन 6 (1), उस्मानपुरा (1), जवाहर कॉलनी (1), बन्सीलाल नगर (1), खडकेश्वर (1), सुराणा नगर (3), एन-5 सिडको (1), हायकोर्ट कॉलनी (1), वेदांत नगर (1), पदमपुरा (1), मेडीकेयर हॉस्पिटल परिसर (1), अन्य (70) ग्रामीण (23)पैठण एकतुणी (1),मोहटा देवी मंदीर, बजाजनगर (1),गुरुकृपा हौ.सो. बजाजनगर (2),शिवाजी नगर, वाळूज (1),सिल्लोड (1), अन्य (17)