१३१ किमी सायकलिंग करून अभिवादन :महामानवाच्या जयंतीदिनी सतीश अन्वेकर यांचा विधायक उपक्रम

औरंगाबाद ,१६ एप्रिल  /प्रतिनिधी :- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, “भारतरत्न” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तब्बल १३१ किलोमीटर अंतर सायकलिंग करून अभिवादन करण्यात आले.बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीदिनी मधा सायकलिंग क्लब तर्फे या व्हर्च्युअल  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी १४ ते १५ एप्रिलला चोवीस तासांत हे चॅलेंज पूर्ण करणे आवश्यक होते.औरंगाबाद येथील सायकलिस्ट व धावपटू सतीश पुरूषोत्तम अन्वेकर यांनी हे उद्दिष्ट साध्य केले.

या अभिवादन राईडचा शुभारंभ भिमजयंतीदिनी भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुष्पहार अर्पण करून झाला.यावेळी कोंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम पठाण, आयोजन समितीचे स्थानिक प्रतिनिधी भूषण म्हस्के, उत्तरा म्हस्के, अभिजित म्हस्के, शरद डोंगरे, संदीप आडसूळ, सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते.विद्यापीठ परिसरातील डॉ.आंबेडकर पुतळा, छावणी येथील बाबासाहेब यांचे घर , मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन, दौलताबाद, हर्सूल, टीव्ही सेंटर, जळगाव रोड, बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, जालना रोड मार्गे संभाजी महाराज पुतळा येथे या राईडचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाबद्दल अन्वेकर यांना मधा सायकलिंगतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

अनोख्या पध्दतीने प्रदीर्घ अंतराची सायकलिंग करून महामानवाच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.या राईडची तांत्रिक जबाबदारी अभंग गंगावणे, रोहित चव्हाण, यश फुलारी, वैभव पवार यांनी सांभाळली,तसेच वेदांत नळसकर, अर्णव मुंदडा, कौशल भुतडा, तुषार हुसे, देवेश मुळे, अनिता गवई, निता गंगावणे, अविनाश कांबळे, पृथ्वीराज जोंधळे, वल्लभ पवार, शुभम धानोरकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.