औरंगाबाद जिल्ह्यात 4834 कोरोनामुक्त, 3032 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 11 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 371 जणांना (मनपा 163, ग्रामीण 208) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 4834 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 267 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 200, ग्रामीण 67) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8216 झाली आहे. आजपर्यंत एकूण 350 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3032 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सायंकाळनंतर 73 रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 59 रुग्णांची अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

Image may contain: text

*आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू*घाटीमध्ये नऊ जुलै रोजी बायजीपुऱ्यातील 34 वर्षीय स्त्री, 10 जुलै रोजी लोटाकारंजातील 50 वर्षीय, 11 जुलै रोजी दीपनगर, हडकोतील 80 वर्षीय, वाळूज परिसरातील श्रद्धा नगरमधील 50 वर्षीय, क्रांती चौकातील 69 वर्षीय, शहरातील विविध तीन खासगी रुग्णालयात मनजित नगरातील 73 वर्षीय, सुरेवाडीतील 52 वर्षीय, नवजीवन कॉलनीतील 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *