छावा मराठा संघटनेचे संस्थापक सरचिटणीस मिलिंद श्रीराम पाटील यांचे निधन

औरंगाबाद ,२१ जानेवारी /प्रतिनिधी :- छावा  मराठा संघटनेचे संस्थापक सरचिटणीस तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मिलिंद श्रीराम पाटील यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी आज सकाळी ७ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने समस्त छावा संघटना परिवार शोकाकुल झाला आहे. 


मिलिंद पाटील यांनी अनेक सामाजिक विषय प्रभावीपणे हाताळले आहेत. त्यांनी अनेक  प्रभावी  व लक्षवेधी आंदोलने केली आहेत. अनुकंपा संघटनेच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नौकरीला लावले.मिलिंद पाटील यांचे कार्य समाजाच्या व शहराच्या कायम स्मरणात राहील.
त्यांच्या पार्थिवावर  दुपारी  मुकूंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.