नेपाळला माल पाठविल्याप्रकरणी ट्रकचालकाला अटक 

औरंगाबाद/प्रतिनिधी

नेपाळ येथील एका कंपनीत पाठविण्यासाठी दिलेला 21 लाखांचा माल व भाड्या पोटी दिलेले एक लाख 75 हजार रुपये असा एकूण 22 लाख 75 हजारांचा ऐवल परस्पर लंपास केल्याप्रकरणात चिकलठाणा पोलिसांनी एका लॉरी मालकाला मंगळवारी दि.6 पहाटे ठाण्यातून अटक केली.विरेंद्रप्रतापसिंग सितारामसिंग (50, रा. इसीपूर ता.सदर, जि. प्रतपागड उत्तर प्रदेश,ह.मु किशोर पार्क पारसिक नगर, कळवा ठाणे) असे आरोपी लॉरी मालकाचे नाव असून त्याला शुक्रवारपर्यंत 9 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस.कादरी यांनी दिले.

प्रकरणात सुभाष जनार्दन सिंह (रा. गडवरा अहोली ता. ग्यानपुर जि. भवोई उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, सुभाष सिंह कोईम्बतूर येथील रामेश्र्वर ट्रान्सपोर्ट कपंनीत आहेत. सदर कंपनीचा व्यवसाय हा देशभर चालतो. कंपनीचे एक कार्यालय पुणे येथे देखील आहे. दरम्यान शेंद्रा एमआयडीसी गट नं.13 व 14 येथील लोहिया प्रि. इंजिनियर बिल्डींग प्रा. लि. कंपनीने थ्री सेट्स प्री फॅब्रीकेटेड बिल्डींग 21 लाख रुपये किंमतचे 20 हजार 327 किग्र वजानचे 21 पॅकेज नेपाळ येथील कुपोनडोल ललीतपुर परिसरातील रेलिग्रे लि. कंपनीत पाठविण्यासाठी सुभाष सिंह यांच्या कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानूसार सदरील माल हा ट्रेलर व्दारे पाठविण्याचे ठरले. कंपनीने सर्व कायदेशीर बाबी पार पाडून सदरील माल  औरंगाबादहून ललीतपूर नेपाळ येथे पाठविण्यासाठी मुंबईतील मिथीला रोड लाईन्स ट्रान्सपोर्ट कंपनीला संपर्क साधला. मिथीला ट्रान्सपोर्ट कंपनीने सदरील माल आरोपी विरेंद्रप्रतापसिंह यांच्या लॉरीमध्ये (क्रं. एनएल—01—एबी—6340) नेपाळला पाठविणार असल्याचे सांगितले. त्यानूसार फिर्यादीच्या कपंनीने भाड्यापोटी एक लाख 75 हजार रुपये देखील दिले. 7 मार्च रोजी सदरील माल लॉरी मध्ये भरला गेला व ड्रायव्हर अॅडव्हान्स म्हणून मिथीला कंपनीने एक लाख 55 हजार रुपये जमा केले. त्याच दिवशी सदरील लॉरी औरंगाबादहून नेपाळला निघाली. लॉरी सोनावली लॅन्ड कस्टम स्टेशनला पोहचली असता बार्डर क्रॉसिंगची 22 मे 2020 स्लीप कस्टम अधिकारी यांनी लॉरी पास करण्यासाठी देण्यात आली. मात्र लॉरी चालक अभयराज रामबच्चन यादव (रा. शेखकी चोकी, देवगाव जि. अजमगड)  याने सांगितलेल्या माहितीनूसार, लॉरी मालक विरेंद्रप्रताप याने चालकाला न कळविता 4 जून 2020 रोजी सदरील माल लोड करुन सदरील लॉरी सोनावलीतुर परत माघारी घेवून गेला. आरोपीने सदरील माल नेपाळला पाठविला नाही. सदरील प्रकरणत लॉरी मालकासह लॉरी चालक, मिथीला ट्रान्सपोर्ट कपंनीचे संजय ठाकुर आणि सतिष ठाकुर यांनी संगणमत करुन लंपास केल्याचे फिर्यादीच्या कंपनीस निदर्शनास आले. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून सदरील माल लखनौ (उत्तर प्रदेश) येथे असल्याची माहिती देाखील पोलिसांना दिली आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील जरीना दुरार्णी यांनी गुन्ह्यातील माल लखनौ येथून जप्त करणे आहे. गुन्ह्यात आरोपीला मदत करणार्यां हे बाहेर जिल्ह व राज्यातील असल्याने त्यांचा शोध घेणे आहे. अटक करणे आहे. आरोपीच्या साथीदारांना अटक करणे आहे तसेच अशा प्रकारे आरोपींनी आणखी किती गुन्हे केले आहेत याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.