बलात्कार करणाऱ्या  तरुणाला अटक   

औरंगाबाद,१७एप्रिल /प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या  तरुणाला वडोदबाजार पोलिसांनी सुरत येथून ताब्यात घेत शनिवारी दि.17 पहाटे अटक केली. रविंद्र उर्फ राजेंद्र दत्तु वाघ (22, नायगव्हाण ता. फुलंब्री) असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी दिले.

या प्रकरणात अल्पवयीन पीडितेच्या वडीलांनी फिर्याद दिली. त्यानूसार 24 जानेवारी ोजी आरोपीने पीडितेला फुस लावून पळवून नेल्यची तक्रार दिली. तक्रारीवरुन वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना 16 एप्रिल रोजी पोलिसांनी आरोपीच्या मित्राची चौकशी केली असता, आरोपी हा पीडितेला सुरत (गुजरात) घेवून गेला  असून तेथेच ते दोघे राहत असल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी सुरतहून दोघांना ताब्यात घेतले. महिला दक्षता समितीने पीडितेचा जबाब घेतल्यानंतर आरोपीने तिला फुस लावून पळवून नेले व बलात्कार करुन पीडितेला गर्भवती करण्यास कारणीभूत ठरल्याचे देखील समोर आले.

आरोपीला अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता, सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी आरोपीची वैद्यकिय तपासणी करणे आहे. आरोपीचे कपडे जप्त करणे आहे. आरोपीने पीडितेला गुजरात येथे कोण कोणत्या ठीकाणी नेउन बलात्कार केला याचा तपास करणे आहे. आरोपीचे कोणी साथीदार आहेत काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.ही  विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत दि.19 पोलिस कोठडी सुनावली.