दिलासादायक:लोह्यातील कोरोनाच्या रुग्णात घट

लोहा ,१७ एप्रिल /प्रतिनिधी 

लोहा शहरात मागील महिन्या पासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता.पण पाच दिवसांचा शहर वासीयांना केलेला व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या दहा दिवसाचा लॉक डाऊन झाल्यामुळे शहरातील कोरोना रुग्ण संख्येत घट आली तर ग्रामीण भागात सध्या जोरात कोरोनाचा शिरकाव सुरू आहे.   

लोहा शहरात मागील महिन्याभरा पासून कोरोनामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली. अनेक चालती बोलती आणि कमी वयाची माणसं आपल्यातून निघून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाज मन भयभीत झाले आहे.असा काळात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढला. खाजगी तीन कोविड हॉस्पिटल सह सरकारी कोविड रुग्णालयात रुग्ण संख्या मावेना काहीजण नांदेड, हैदराबाद येथे उपचारासाठी जात होते असा स्थितीत दिलासादायक चित्र गेल्या चार पाच दिवसा पासून समोर येत आहे ते म्हणजे शहरातील कोरोना रुग्णात घट झाली आहे.        

कोविड रुग्णालयात डॉ धनसडे, डॉ पवार यांची सेवा

आपल्या स्वतःचे कोविड हॉस्पिटल सांभाळून प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ मिलिंद धनसडे   हे उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या कोविड रुग्णालयात जाऊन दोन्ही प्रकारच्या म्हणजे गंभीर तसेच सौम्य कोरोना संसर्ग असलेल्याना तपासणी करीत  आहेत. एव्हढेच नाही तर त्यांना कोणते औषध इंजेक्शन गोळ्या लागतात ते सांगत आहेत रुग्ण बरे होताहेत शिवाय रुग्ण नातेवाईक डॉ मिलिंद यांची वाट पाहून असतात   तशीआरोग्य सेवा हृदय रोगतज्ञ डॉ राजेश पवार यांची रुग्णांना सेवा मिळत आहे या दोन्ही डॉक्टर मुळे येथील कोविड सेंटरला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे .डॉ धनसडे, डॉ पवार तसेच या कोविड रुग्णालयातील कार्यान्वित डॉक्टरामुळे मोठा आधार मिळत आहे असे रुग्ण व नातेवाईक आवर्जून सांगतात.