केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात वैजापुरात युवासेनेतर्फे सायकल रॅली

वैजापूर ,३१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पेट्रोल, डिझेल व सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या होत असलेल्या अवास्तव दरवाढी बाबत केंद्र सरकारलाजाग यावी यासाठी वैजापूर युवासेनेतर्फे रविवारी सायकल रॅली काढण्यात आली.  

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व आ.रमेश पाटील बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी केले.येवला नाका येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचीन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, नगरपालिकेतील शिवसेना गटनेते प्रकाश चव्हाण, कल्याण जगताप, डॉ.परेश भोपळे,युवासेनेचे आमेर अली, श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, डॉ. निलेश भाटिया, संजय बोरणारे, अमोल बोरणारे, ज्ञानेश्वर टेके, पारस घाटे,वसंत त्रिभुवन,राजू छानवाल, राजू कुरेशी, हबीब खान, सागर अस्वले, भरत कदम,अनिल न्हावले, पप्पू लांडे,बंटी बोरणारे, रामकीसन जोरे, श्रीराम निकम, हरी साळुंके,नरेंद्र सरोवर यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.