औरंगाबाद जिल्ह्यात 277 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,11 मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 20 : औरंगाबाद जिल्ह्यात आज ३०४ जणांना (मनपा१७२, ग्रामीण१३२ ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत २३,९८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 277 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30768 झाली आहे. आजपर्यंत एकूण 866 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5917 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील दहा, तर बीड जिल्ह्यातील एक, अशा २२ ते ९१ वयोगटातील ११ बाधितांचा उपचारादरम्यान घाटीसह खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ८६६ झाली आहे. त्याचवेळी रविवारी (२० सप्टेंबर) जिल्ह्यात २७७ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३०,७६८ झाली आहे. तसेच रविवारी जिल्ह्यातील ३०४ बाधित (शहरः १७२, ग्रामीणः १३२) हे करोनामुक्त झाल्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या २३,९८५ झाली आहे व सध्या ५,९१७ बाधितांवर उपचार सुरू आहे.

शहरातील बाधित असे

शहर परिसरातील नव्या बाधितांमध्ये बॉईज हॉस्टेल येथील १, नागेश्वरवाडी १, एन-सहा सिडको २, देवानगरी १, सरस्वती कॉलनी १, गारखेडा २, विष्णू नगर ५, सुपारी हनुमान मंदिर रोड १, गुरू गजानन कॉलनी १, हनुमान नगर १, मुकुंदवाडी १, जाधववाडी २, कैलास नगर १, गांधी नगर १, श्रीकृष्ण नगर २, कटकट गेट १, श्री कॉलनी २, नागेश्वरीवाडी १, सातारा परिसर २, भावसिंगपुरा १, सिडको २, सिव्हिल हॉस्पिटल परिसर ३, उत्तम नगर १, पिसादेवी १, घाटी परिसर १, जयभवानी नगर, मुकुंदवाडी १, एन-चार सिडको १, अहेमद कॉलनी १, एन-आठ सिडको १, आकाशवाणी परिसर १, नवजीवन कॉलनी, हडको १, हर्सूल टी पॉइंट ३, गुलमंडी १, एन-पाच, सिडको १, बीड बायपास २, एन-दोन, सिडको, ठाकरे नगर १, दशमेशनगर १, बजरंग चौक १, एएसबी कॉलनी ३, रेल्वे स्टेशन हमालवाडा १, पद्मपुरा, मोची गल्ली १ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.  

ग्रामीण भागातील बाधित असे

ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये डवला, सिल्लोड येथील १, वाळूज परिसर ३, तालवाडा, लोणी १, मधला पाडा, शिऊर २, खालचा पाडा, शिऊर १, सावखेडा, लोणी १, कुंभेफळ १, जैनपुरा, पैठण १, साळीवाडा, पैठण १, इंदिरा नगर, पैठण २, आवडे उंचेगाव, पैठण १, यशवंत नगर, पैठण २, दहेगाव १, चंपानेर, कन्नड १, नायगाव, गंगापूर १, घाणेगाव, गंगापूर १, संतोषी माता कॉलनी, कन्नड ४, हस्ता कन्नड १, शिवाजीनगर, कन्नड २, शर्मा हॉटेल जवळ, कन्नड १, चांगतपुरी, पैठण ३, भिवधानोरा, गंगापूर २, रांजणगाव, गंगापूर १, बगडी, गंगापूर १,  कनकोरी, गंगापूर १, डेपो रोड, वैजापूर ३, महालगाव, वैजापूर १, साईनाथ नगर, वैजापूर १, भेंडवाडी, वैजापूर १, येवला रोड, वैजापूर २, आनंद नगर, वैजापूर ३, बाबरा १, बोरवाडी, खुलताबाद १, साई मंदिर, बजाज नगर १, मोबिनपुरा, बालापूर १, सासवडे मेडिकल, बजाज नगर १, खतखेडा, कन्नड ४, आडगाव, कन्नड ५, औरंगाबाद तालुका ९, गंगापूर तालुका ७, कन्नड तालुका ५, वैजापूर तालुका १, पैठण तालुका २, सोयगाव तालुका ६ या ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

सिटी एंट्री पॉइंटवर ५१ बाधित

अँटिजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ५१, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७२ व ग्रामीण भागात २६ बाधित आढळून आले आहेत. सिटी एंट्री पॉईंटवर आढळलेल्या नव्या बाधितांमध्ये राम नगर येथील १, चिकलठाणा १, कामगार कॉलनी १, एएस क्लब १, भानुदास नगर ३, सातारा परिसर ३, विजय नगर १, सेव्हन हिल १, कटकट गेट १, एन-११ येथे १, घाटी परिसर १, शेंद्रा १, बाबरगाव १, बीड बायपास २, आडगाव १, बजाज नगर ३, नक्षत्रवाडी २, बालाजी विहार पैठण ४, इटखेडा २, काल्डा कॉर्नर १, पहाडसिंगपुरा १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा १, साई नगर, सिडको १, एन-नऊ, सिडको २, सैनिक कॉलनी, पडेगाव ३, शहागंज १, लिंबेजळगाव १, रांजणगाव २, आंबेडकर नगर १, होनाजी नगर १, पवन नगर २, राधास्वामी कॉलनी १, पिसादेवी १, सिल्लोड १ या ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.      

घाटीत नऊ, खासगीत दोघांचा मृत्यू

घाटीत रमा नगरातील ५५ वर्षीय पुरुष, धरला सिल्लोड येथील ७० वर्षीय महिला, सिडको एन-सातमधील ९१ वर्षीय पुरुष, बिडकीन, पैठणमधील ६५ वर्षीय महिला, क्रांती नगर, साजापूर येथील ५५ वर्षीय महिला, गजानन कॉलनीतील ५१ वर्षीय पुरुष, अंबेलोहळ, गंगापुरातील ७० वर्षीय पुरुष, मिलकॉर्नरमधील २२ वर्षीय महिला, तर बीड जिल्ह्यातील ५० वर्षीय पुरुष बाधितांचा घाटीत मृत्यू झाला. तसेच खासगी रुग्णालयात एन-दोन सिडको, माया नगरातील ७३ वर्षीय पुरुष व विद्या कॉलनी, भोईवाडातील ५८ वर्षीय पुरुष करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *