बकऱ्या चोरणाऱ्याचा जामीन फेटाळला

औरंगाबाद:

शेडच्या तारा तोेडुन शेडमध्ये बांधलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या 75 बकऱ्या  चोरणाऱ्या  चोरट्याने सादर केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृगांरे-तांबडे यांनी मंगळवारी  फेटाळला.

वाजेद अंसार कुरेशी (35, रा. कामगार कॉलनी, चिकलठाणा)  असे आरोपीचे नाव असुन त्याला 25 जून रोजी अटक करण्यात आली होती. तर न्यायालयाने त्याला 30 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर आरोपीने नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला होता.

प्रकरणात दत्ता लक्ष्मण घोरपडे (33, रा. पिंप्रीराजा ता.जि. औरंगाबाद) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, घोरपडे हे शेळी पालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी शेळीपालनासाठी शेतवस्तीवर शेड बांधले असुन त्यात 90 बकऱ्या होत्या. 25 जून रोजी पहाटे अडीच तीन वाजेच्या सुमारास बकऱ्या ओरडण्याचा आवाजा आल्याने घोरपडे हे बॅटरी घेवुन बाहेर आले. तेंव्हा वाजेद कुरेशी व दोन—तिन ओळखीचे लोक दोन पिकअप मध्ये बकऱ्या भरताना दिसले. घोरपडे यांनी आरोपी वाजेदला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोनही पिकअप चितेगावच्या दिशेने गेल्या. त्यानंतर घोरपडे यांनी दुचाकीवर प्रयत्न केला असता एक पिकअप साखर कारखाण्याच्या तर एक चितेगाव रोडने निघुन गेली. त्यानंतर घोरपडे यांनी शेडमध्ये पाहणी केली असता 98 पैकी दीड लाख रुपये किंमतीच्या 75 बकऱ्या चोरट्यांनी चोरल्याचे समोर आले. प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *