आम आदमी पक्षाची आज पालिका निवडणुकीसाठी आढावा बैठक

राज्य अध्यक्ष  रंगा राचुरे  गुरुवारी औरंगाबादमध्ये

औरंगाबाद,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी:-आज आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रंगा  राचुरे हे औरंगाबाद शहरातील महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी गुरुवारी येत आहेत.सदरील वैठकीत शहराच्या विविध प्रश्नावर चर्चा करून महानगरपालिका निवडकीसंदर्भात आढवा घेतला जाणार आहे.

या बैठकीस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष  किशोर माधियान (यूएन माजी सनदी  अधिकारी), महाराष्ट्राचे संघटन मंत्री विजय कुंभार ,महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे हे सर्व  औरंगाबाद शहरातील होणार्‍या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी  येणार आहेत. गुरुवारी  दुपारी 3.30 वाजता एपीआय कॉर्नर,ठाकरे नगर , एन- 2 सिडको येथे बैठक होणार आहे. तरी सर्व औरंगाबाद शहरातील आजी/माजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे उपस्थित राहणे बंधनकारक आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान आपचे राज्य कमिटी सदस्य तथा औरंगाबाद शहर अध्यक्ष डॉ.सुभाष माने यानी केले आहे.