औरंगाबाद जिल्ह्यात 321 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सात मृत्यू

जिल्ह्यात 16440 कोरोनामुक्त, 4307 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 25 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 287 जणांना (मनपा 55, ग्रामीण 232) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16440 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 321 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21392 झाली आहे. आजपर्यंत एकूण 645 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 221 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 68, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 45 आणि ग्रामीण भागात 77 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.
ग्रामीण (86)
घाटनांद्रा (1), अजिंठा, सिल्लोड (1), दारेगाव (1), मकरनपुरा, कन्नड (1), कनकावटी, कन्नड (1), खुप्टा सिल्लोड (1), केकट, पैठण (1), लिमनगाव (1), वाळूज (1), औरंगाबाद (15), गंगापूर (12), कन्नड (24),सिल्लोड (19), पैठण (7)
मनपा (22)
चेतन नगर, पडेगाव (1), दिगंबर गल्ली, बेगमपुरा (1), कार्तिक नगर (3), चिकलठाणा (1), कांचनवाडी (2), एनआरएच (1), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (1), गजानन नगर (1), प्रबोध नगर, पानचक्की (1), सेव्हन हिल, विद्या नगर (1), समर्थ नगर (2), एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर (1), अन्य (6)

सिटी एंट्री पॉइंट (68)
सिडको महानगर (3), पंचशील नगर (1), बजाजनगर (1), आंबेडकर नगर (5), मयूर पार्क (3), एन सहा सिडको (2), एन सात सिडको (4), जटवाडा रोड (1), बायजीपुरा (1), पिसादेवी रोड (3), कांचनवाडी (1), वेरूळ (1), कन्नड (1), होनाजी नगर (1), चिकलठाणा (1), शेंद्रा एमआयडीसी (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटल (2), सनी सेंटर (1), सातारा परिसर (2), हर्सुल परिसर (1), एन अकरा, हडको (1), विष्णू नगर (1), मयूरबन कॉलनी (1), कांचनवाडी (1), नक्षत्रवाडी (4), इटखेडा (1), पैठण (3), निलजगाव (1), रोशन गेट (1), पडेगाव (1), उस्मानपुरा (1), एल अँड टी जांभाळा कॅम्प (1), वडगाव, रामपुरी (1), करोडी (4), संघषर् नगर (1), बजरंग चौक (1), पुंडलिक नगर (1), जय भवानी नगर (1), मुकुंदवाडी (1), शेंद्रा एमआयडीसी (1), भालखाना (1), साईपूर (1), इलवाडा तांडा (2)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत गांधी नगरातील 40 वर्षीय पुरूष, जवाहर कॉलनीतील 75 वर्षीय पुरूष, मलकापूर, गंगापुरातील 65 वर्षीय पुरूष, अप्पेगाव, गंगापुरातील 56 वर्षीय पुरूष, औरंगाबादेतील 82 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात एन अकरा, हडकोतील 77 वर्षीय पुरूष, हिना नगरातील 81 वर्षीय पुरूष कोरोनाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विनामास्क बैठकीस उपस्थित राहणाऱ्यांना जिल्हाधिका-यांनी केले दंडित
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मास्क परीधान न करणा-यांना 500 रुपये दंड लावून एक मास्क देण्याचा नुकताच आदेश काढला.
सदरच्या आदेशाचे पालन होत आहे का नाही यावर स्वत: जिल्हाधिकारी लक्ष ठेवुन आहेत. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरुच आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो शाखेमार्फत आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क उपस्थित असणा-या वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटवळ, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी छाया बानखेले, वाहनचालक साईनाथ चंदनसे, या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तसेच ज्ञानेश्वर त्रिभुवन या अभ्यागतास मास्क परीधान न केल्यामुळे प्रत्येकी 500 रुपये दंड आकारुन एक मास्क जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *