विवेकानंद केंद्राचे युवा शिबिर दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये

औरंगाबाद ,६ मे /प्रतिनिधी :-विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा औरंगाबाद  तर्फे दरवर्षी प्रमाणे घेतले जाणारे “उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबीर” यावर्षी औरंगाबादमधील  दिल्ली पब्लिक स्कूल येथे होणार आहे. 10 मे ते 15 मे या कालावधीमध्ये हे शिबिर होणार आहे. 

इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिबिरात सहभागी होता येईल. दिनचर्या ,जीवनशैली, योगासने प्राणायाम , खेळ ,शास्त्रीय संगीत, कराटे ,लाठी काठी फिरविणे अशा कौशल्यांच्या प्रशिक्षणाचा समावेश या शिबिरात असेल. कोरोनाच्या काळात एकलकोंडेपणा आलेल्या मुलांना या शिबिरात व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. नाव नोंदणी आपण पुढील नंबर वर  करू शकता…. अधिक माहितीसाठी संपर्क-अविनाश माने – +91 70580 93681