डिजिटल शैक्षणिक कविता गायन स्पर्धा,नितीन धामापूरकर प्रथम

औरंगाबाद, दि. 05 : डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली जून 2020 मधील १ली ते १० वी वर्गाच्या शैक्षणिक कवितांचे गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक श्री नितीन धामापूरकर यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक नाशिक च्या श्रीमती ज्योती खंडेराव फड यांनी प्राप्त केला. तर तृतीय क्रमांक श्री राजेंद्र सपकाळ  सिल्लोड, औरंगाबाद यांनी प्राप्त केला उत्तेजनार्थ श्री राजेश नारायण ढेंगळे यांना पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार अनुक्रमे २१००/, ११००/- , ५०१ व उत्तेजनार्थ ३०१/- रोख  व डिजिटल प्रमाणपत्र  स्वरुपात देण्यात आला.     राज्यस्तरीय आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत ११७ कविता प्राप्त झाल्या. या कवितांचे संकलन व ॲनिमेशन सह व्हिडीओ निर्मिती प्रकाशसिंग राजपूत यांनी केले . या कविता राज्यभरातून २ लक्ष ५० हजार  विद्यार्थ्यांनी अवघ्या २० दिवसात व्हिडिओ स्वरूपात पाहिल्या. लॉकडाऊन मध्ये शाळा बंद असताना डिजिटल समूह महाराष्ट्र च्या वतीने आयोजित या स्पर्धेचा उद्देश निकाल लागण्यापूर्वी सफल झालेला आहे. या स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ हे प्रायोजक झाले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ विठ्ठल कुलकर्णी, डॉ सई पाटील , डॉ प्रतिभा फाटक यांचे सहकार्य लाभले. डिजिटल स्कुल समूह समूह निर्माता श्री प्रकाशसिंह राजपूत व समूहाच्या मुख्य प्रशासक लीना वैदय व सहप्रशासक श्री अमोल वंजारी यांनी स्पर्धेची कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली. तर परिक्षक म्हणून श्री सुभाष शिंदे, श्री सुहास वैदय व सतीष डिवरे हे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *