गंगापूर बाजार समितीवरील अप्रशासकीय मंडळ बरखास्त: प्रशांत गावंडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

गंगापूर ,२५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-गंगापूर येथील बाजार समितीत महाविकास आघाडी सरकारने नेमलेले अप्रशासकीय सदस्य मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून अधिकारी प्रशांत गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

बाजार समितीत महाविकास आघाडीचे १५ संचालक होते मुख्य प्रशासक म्हणून राष्ट्रवादीचे ऋषिकेश पाटील काम पाहत होते. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात महाविकास आघाडी फुट पडली काँग्रेस पक्षाच्या नऊ सदस्यांनी खुल्या लिलाव पद्धतीला विरोध केला. आपल्याच संचालक मंडळाचा विरोध प्रशासक ऋषीकेश पाटील यांनी मोडीत काढला होता. त्यामुळे येथील बाजार समिती जिल्ह्यात चर्चेत होती. याविषयी जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे यांनी प्रशासक नियुक्तचे आदेश काढले आहेत गंगापूर बाजार समितीवर १५ व्यक्तींचे शासकीय प्रशासक मंडळाच्या ऐवजी सदर बाजार समितीचे दैनंदिन कामकाज आणि संचालक मंडळ निवडणुका पार पाडण्याकरता प्रशासक म्हणून सहकार अधिकारी श्रेणी एक संलग्न सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे प्रशासक म्हणून प्रशांत विष्णू गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे येथील बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.  

प्रशासक ऋषिकेश पाटील यांच्या कार्यकाळात बाजार समितीच्या मुख्य आवारात धान्य चाळण नियंत्रण व एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम कार्यान्वित करण्यात आले. वीस वर्षांपूर्वीचे अतिक्रमण हटवन्यात आले. पेट्रोल व डिझेल पंप सुरू करण्यात आला, संपूर्ण व्यवहार डिजिटल करण्यात आले, आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येऊन आदि कामे करण्यात आली.

प्रशांत बंब समर्थकांचे अंदाज चुकीचे

येथील बाजार समितीत आ.प्रशांत बंब यांच्या समर्थकांची नवीन अप्रशासकीय संचालक मंडळ नियुक्ती होणार होते. माजी सभापती नंदकुमार गांधी यांचे नाव देखील निश्चित होते. मात्र शासकीय प्रशासकाची नियुक्ती झाल्याने आता आ.बंब समर्थकांच्या अप्रशासकीय संचालक पदाचा अंदाज चुकीचा ठरला आहे.