औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात होणार अभ्यागतांची अँटिजेन कोरोना चाचणी

औरंगाबाद जिल्ह्यात 281 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,दिनांक.24: जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन कामकाजनिमित्‍त येणा-या नागरिक/अभ्‍यागतांकरिता कार्यालयात भेटी पूर्वी कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील ऑक्सीजन व तापमानाची तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये जर कुणी अभ्यागत कोरोना संसर्ग संशयित आढळून आले तर त्यांची कोरोना रॅपिड अॅन्‍टीजेन टेस्ट (RAT) प्रवेशव्‍दारावर करणे अनिवार्य करण्‍यात आले आहे. सध्‍यस्थितीत कोरोनाचा पुन:श्‍च प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा भाग म्‍हणून ही चाचणी जिल्‍हाधिकारी कार्यालयात ये जा करणा-या कोरोना संसर्ग संशयित अभ्यागतांसाठी अनिवार्य करण्‍यात आली आहे. सदर चाचणी करण्‍यासाठी आरोग्‍य विभागाचे पथक कार्यरत करण्‍यात आले आहे. या प्रक्रियेची सुरुवात प्रभारी जिल्‍हाधिकारी डॉ अनंत गव्‍हाणे यांनी स्‍वत: ही चाचणी करुन घेतली आहे. सदरील चाचणी करुन घेण्याबाबत सहकार्य करावे व उपस्थित वैद्यकीय पथकांनी दिलेल्‍या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्‍हा प्रशासनातर्फे आवाहन करण्‍यात आले आहे.

जिल्ह्यात 46721 कोरोनामुक्त, 1312 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 24 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 71 जणांना (मनपा 50, ग्रामीण 21) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46721 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 281 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49291 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1258 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1312 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (262)एन-3 सिडको (6), बीडबाय पास (5),गुलमंडी (1), एन-9 (1), एन-5 (1), एन-7 (3), चंद्रनगर सिडको (1), श्रीकृष्ण नगर (1),हर्सूल (3), रामनगर (2),नारेगाव (1), नारळीबाग (2), सावरकर चौक (1), गारखेडा (3),हनुमान नगर (1), लक्ष्मीनगर (1), रामाकल्चरल हॉल (1), नंदनवन कॉलनी (5), एन- 6 (1), हडको (3),कासलीवाल विश्व (1), कैलास नगर (1),पुंडलिकनगर (2), ज्योती नगर (5), श्रेय नगर (1), शिवाजी नगर (2), जयभवानी नगर (1),एन-2 (3), वेदांत नगर (1), एन-1 सिडको (2), दशमेश नगर (1),देवळाई रोड परिसर (3), मुकुंदवाडी (1),एन -4 (2), गादीया विहार (2), पडेगाव (3), चिकलठाणा (1), एन -8 (1), शिवकॉलनी (3), चेतक घोडा परिसर (1),राधास्वामी कॉलनी (1),घाटी परिसर (2),जाधववाडी (2) सुराणा नगर (1), प्रतापनगर (2),संजयनगर (1),वसुंधरा कॉलनी (1), पदमपुरा (2), वेदांतनगर (2), सातारा परिसर (1),पिसादेवी (1),एसबी कॉलनी (1), निराला बाजार (3),खिवंसरा पार्क (1), समर्थ नगर राजतारा हौ. सो (2), सिंधी कॉलनी (2), सुयोग हा. सो. (1), शक्ती नगर, सीबीएस रोड (3), इसीआय मोबिलिटी प्रा. लि. (2), अन्य (151)

ग्रामीण (19)बजाजनगर (5), राजतारा हौ. सो (2), अन्य (12)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत खुलताबाद तालुक्यातील सुलतानपुरा येथील 47 वर्षीय पुरूष, शहरातील कलेक्टर ऑफिस कंपाऊंड परिसरातील 74 वर्षीय पुरूष आणि देवगाव रंगारी, कन्नड येथील 80 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.