सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

 औरंगाबाद, दिनांक 24 : मराठवाडा आणि  महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी  यांचे बुधवारी निधन झाले.निधनसमयी त्यांचे वय १०४ होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा ,दोन मुली,पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Displaying bhujangrao 4.jpg

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पिंपळगाव गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भुजंगराव यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. १ मे १९६० ला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. या दरम्यान, तत्कालीन २६ जिल्ह्यातील जनगणनेचे अवघड काम त्यांच्याच नेतृत्वात झाले.१ मे १९६० ला महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. या दरम्यान, मुंबईत भारताच्या पहिल्या जनगणनेचेअवघड आणि जोखमीचे काम भुजंगराव यांनी मोठ्या कुशलतेने पार पाडले. तत्कालीन २६ जिल्ह्यातील जवळ जवळ १ लाख गणनाकारांना प्रशिक्षण देणे, व त्यांच्याकडून काम करून घेणे असे प्रचंड काम त्यांना करावे लागले.

Displaying sharad pawar bhujangrao.jpeg

भुजंगराव कुलकर्णी यांची कारकीर्द
भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी यांचा जन्म परळी तालुक्यातील पिंपळगाव या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. १९३२ ला औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३४ ला वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. १९३६ साली हैदराबाद येथून ते  प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण होऊन  त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले. १९३८ साली ते ह्याच विद्यापीठातून भौतिकशास्त्रामध्ये एम.एस्सी  प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३९ मध्ये ते निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू झाले. १९४० ला ते ‘डिस्ट्रीक्ट लँड रेकॉर्ड ऑफीसर’ म्हणून औरंगाबाद येथे रुजू झाले. १९४७ ला ते ‘असिस्टंट कमिशनर’ या श्रेणी-१ च्या मुलकी सेवेत आले. ते १९५० साली आयएएस झाले. १९५३ ला ते नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. 

वेगळ्या मराठवाड्याचा आधी अभ्यास व्हावा - social | Maharashtra Times

१९५४ ला भूमी आयोग स्थापन झाला. त्या विभागाचे सचिव म्हणून भुजंगरावांची नेमणूक झाली. या आयोगाचा अहवाल सचिव म्हणून भुजंगरावांनी तयार केला. १९५६ ला राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांबरोबर भुजंगराव मुंबई राज्यात आले आणि औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. १९५९ला ते जनगणनेच्या कामासाठी भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या जनगणनेसाठी ‘प्रमुख’ म्हणून त्यांनी काम पाहिले. 

Displaying Bhujangrao sule .jpg

१९६५ ला पुणे महानगर पालिकेकडे ते म.न.पा. आयुक्त म्हणून आले. १९६९ ला ते सचिव म्हणून मुंबईत आले. सुरूवातीला नगरविकास, आरोग्य व गृहनिर्माण या तीन खात्याचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. १९६९च्या अखेरीस त्यांनी राज्याच्या सिंचन विभागाचा सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली व १९७४ च्या अखेरीस भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून ते निवृत्त झाले.

निवृत्तीनंतरही त्यांनी मराठवाडा विकास महामंडळ, मराठवाडा अनुशेषासंदर्भात वि. म. दांडेकर समिती, अकृषी विद्यापीठांची लेखा समिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, मराठवाडा वैधानिक मंडळात उल्लेखनीय कार्य केले.

Displaying Bhujangrao-Kulkarni-696x447.jpg

मराठवाड्याच्या विकासातील भरीव योगदानाबद्दल भुजंगराव यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.निवृत्तीनंतरही मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, भुजंगराव हे पीएच.डी. झालेले नसतानाही त्यावेळचे राज्यपाल अलियावर जंग यांनी विद्यापीठाला चांगला प्रशासक हवा म्हणून त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नेमले. भुजंगरावांनी ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. राज्य नियोजन मंडळावर व दांडेकर समितीवर सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दांडेकर समिती, न्हावाशेवा बंदर, अकृषी-विद्यापीठांची लेखासमिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, मराठवाडा वैधानिक मंडळ, कापूस एकाधिकार योजना पुनर्विलोकन समिती, राज्य नियोजन मंडळ, टेक्‍स्टाईल मिल, राज्य सिंचन आयोग, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सरस्वती भुवन, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, सेंट्रॉन कंपनी, आयसीम कॉलेजसारख्या अनेक संस्थांद्वारे ते सतत कार्यरत राहिले.