औरंगाबाद जिल्ह्यात 82 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 44342 कोरोनामुक्त, 478 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 06 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 78 जणांना (मनपा 67, ग्रामीण 11 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44342 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 82 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46031 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1211 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 478 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (66) जयभवानी नगर (1), शिवशंकर कॉलनी (1),भाग्यनगर (1), सेंट फा्रन्सेस स्कुल (1),बायजीपूरा (1), उस्मानपुरा (4), पैठण गेट (1),शहानूर वाडी (2), पडेगाव (1),एन सहा, सिडको (1), उल्कानगरी (1), पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (2),जटवाडा (1), गुलमोहर कॉलनी (1),धूत हॉस्पिटल (3),सातारा परिसर (1),समर्थ नगर (1), शहानुरवाडी (1), नवजीवन हॉस्पिटल परिसर (1), सराफा भोवरी कोठडा (1), एन-4 सिडको (4), न्यु गणेश नगर (1), पुंडलिक नगर (1), महालक्ष्मी चौक (1), हर्सूल, टी. पॉईट (3), एन-8 (1), जिंन्सी चौक (1),गारखेडा (1), अन्य (26)

ग्रामीण (16)रांजणगाव (1), पिंप्री राजा (1), वडगाव (1), अन्य (13)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत तेलवाडीतील 45 वर्षीय पुरूष, अल्तमश कॉलनीतील 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.