पुणे जिल्हा परिषदेच्या पॅनलवर ॲड. राजेभोसले यांची नियुक्ती

औरंगाबाद,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत प्रलंबित व नव्याने दाखल होणाऱ्या दाव्यांसंदर्भात प्रकरणांमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या वकील पॅनलवर विधीतज्ज्ञ म्हणून ॲड. संदीप बी. राजेभोसले यांची नियुक्ती करण्यात आली.

पुणे जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच क्षेत्रीय स्तरावरील प्रलंबित असलेल्या व नव्याने दाखल होणाऱ्या दाव्यांसंदर्भात विविध स्तरावरील प्रकरणांमध्ये पुणे जिल्हा परिषदेची बाजु प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच विविध न्यायालयातील सर्व प्रकरणांबाबत कायदेशीर सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणेकामी पुणे जिल्हा परिषदेकरीता वकील पॅलवर विधी तज्ञांची नेमणुक करणेकामी पुणे जिल्हा परिषद, पुणे यांनी अर्ज मागविले होते.
पुणे जिल्हा परिषदेने विधिज्ञ नियुक्तीसाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यानुसार विविध न्यायालयाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, विधीविषयक वाढीव पदविका, वकिली व्यवसायाचा अनुभव लक्षात घेवून ॲड. राजेभोसले यांची नियुक्ती केली. ॲड. सुधीरकुमार घोंगडे, ॲड. दिनेश चव्हाण, ॲड. नमिता सरदेशपांडे, ॲड. फराह शेख, प्रशांत गायकवाड, ऋषीकेश निकम, चेतन बोरसे, पुजा बोरूडे आदींनी अभिनंदन केले.