औरंगाबाद जिल्ह्यात 66 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

सचखंड एक्स्प्रेस या रेल्वेने येणाऱ्या सर्व प्रवाशांची करोना चाचणी करण्याचा निर्णय

औरंगाबाद, दिनांक 21 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 90 जणांना (मनपा 80, ग्रामीण 10) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 40458 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 66 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42246 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1131 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 657 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.सचखंड एक्स्प्रेस या रेल्वेने येणाऱ्या सर्व प्रवाशांची करोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी उद्या रविवारपासून रेल्वेस्टेशनवर पालिकेची दोन पथके तैनात केली जाणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी ही माहिती दिली.

मनपा (56) ज्योती नगर (1), एन तीन सिडको (1), देवळाई रोड (1), पडेगाव (2), सातारा गाव (1), अहिंसा नगर (1), सावंगी हर्सुल (1), सातारा परिसर (2), देवगिरी व्हॅली, मिटमिटा (1), शीतल नगर, शहानूरवाडी (1), सिंधी कॉलनी (1), मिटमिटा (1), सृष्टी रेसिडन्सी (1), देवगिरी महाविद्यालय परिसर (1), त्रिमूर्ती चौक (1), वंदे मातरम माध्यमिक विद्यालय (1), टिळक नगर (1), सोनामाता विद्यालय (1), शिवाजी महाविद्यालय (1), एन वन, गरवारे स्टेडिअम परिसर (1), तापडिया पार्क (1), संसार कॉलनी, पिसादेवी (2), एन सात सिडको (1), त्रिवेणी नगर (1), एन आठ (2), विशाल पार्क (1), हिमायत बाग (1), कर्मवीर शंकरसिंक नाईक विद्यालय (1), श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, सिडको (1), पोदार इंटरनॅशनल स्कूल (2), जालन नगर (1), इटखेडा (1), जय भवानी नगर (1), अविष्कार कॉलनी (1), एन दोन सिडको (1), देवानगर (1), जिजामाता सो. (1), न्यू हनुमान नगर (1), म्हाडा कॉलनी (2), प्रताप नगर (2), ज्योती प्राईड (1), एन तीन सिडको (1), शिवाजी नगर (1), छावणी परिसर (2), भावसिंगपुरा (1), नवाबपुरा (1), अन्य (2)

ग्रामीण (10) अन्य (10)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत भगतसिंग नगर, हर्सुल येथील 74 वर्षीय पुरूष, म्हाडा कॉलनी, उस्मानपुरा येथील 53 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.