औरंगाबादचे सहा विद्यार्थी काशिद समुद्रात बुडाले: दोघांचा मृत्यू

चौघांना वाचवण्यात यश

औरंगाबाद, ९ जानेवारी  / प्रतिनिधी :-  कन्नडच्या साने गुरुजी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा सहलीला गेले असताना समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर चार जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कन्नडच्या साने गुरुजी विद्यालया बाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांची गर्दी करत आक्रोश केला.

रायगडच्या काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर शाळेचे सहा विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली होती. यापैकी चार विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले असून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालयाचे हे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घटना घडली. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

औरंगाबादच्या कन्नड मधील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल रायगडच्या काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर पोहोचली होती. यापैकी 6 विद्यार्थी समुद्रात बुडाले होते. 6 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं आहे. तर बचाव कार्यात दोन गायब असलेले विद्यार्थी सापडले. यानंतर त्यांना मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रणव सजन कदम आणि रोहन बेडवाल असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.रोहन बेडवाल हा बेपत्ता असून सायली राठोड, कृष्णा पाटील, तुषार वाघ, रोहन महाजन यांची प्रकृती स्थिर आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील ७० विद्यार्थी सहलीसाठी रायगड जिल्ह्यात आले होते. त्यांच्यासमवेत ५ शिक्षकही होते. मुरुड जंजिरा येथील काशीद समुद्रकिनारी हे सर्वजण गेले असता, यातील ६ मुले समुद्रात बुडाली. सुदैवाने ४ मुलांना वाचवण्यात यश आले असून दोघांचा मृत्यू झाला.

वाचवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अलिबाग येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर, समुद्रात बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.