एकजुटीने कोरोनावर मात करूया – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद दिनांक 31 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रसारास अटकाव करण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांच्या एकजुटीने या संकटावर मात करणे शक्य आहे. या संकटात खाजगी रूग्णालयेही मोलाची भुमिका बजावत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी लोकप्रतिनिधी समवेत कोरोना आढावा बैठक घेण्यात येते  यावेळी ते बोलत होते. बैठकीला खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार,  मनपाच्या आरोग्य अधिकारी डाँ. निता पाडळकर आदीची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, कालच शहरातील व खासगी दवाखान्यांना भेट दिली. खासगी रूग्णालयांनी  ‘आपण समाजाला परत देणे लागतो ‘ या भावनेतून उपचार करावे. ‘ समथिंग गिव्ह टू बॅक सोसायटी ‘ ही चळवळ आरोग्य चळवळ औरंगाबाद जिल्ह्यात उभा करण्याचा आपला मानस आहे. तसेच या भेटी दरम्यान कोविड योध्यांचा सत्कारदेखील केला असल्याचे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले की, पथकामार्फत मेडिकल स्टोअर्सवर देखील धाडी टाकण्यात आल्या असून बेकायदेशीर औषधे विकणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर धडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जनजागृतीसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असुन हे पथक जिल्ह्यात जनजागृती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यात आजपर्यंत RTPCR 71274 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 14860 टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. हे प्रमाण 20.85 टक्के एवढे आहे तर अँटीजन चाचण्या 210073 एवढ्या झाल्या असून त्यापैकी 8618 एवढ्या केसेस पॉझिटिव्ह आल्या असून हे प्रमाण 4.10 टक्के एवढे आहे. जिल्या्यत DCH – 3, DCHC – 28, DCCC – 80 रूग्णालये असे एकुण 111 हॉस्पीटल आहेत. यामध्ये 12856 बेड्स, अँटीजेन बेड्स-1759, ICU बेड्स-412 तर 228 व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार भागवत कराड म्हणाले की, शहराचा टेस्टिंग व पॉझिटिव्हिटी दर काय आहे हे नियमितपणे नागरिकांना कळणे आवश्यक आहे.  खासदार इम्तियाज जलील म्हणाले की महात्मा् फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ज्या रुग्णांना लाभ देण्यात आला आहे त्यांची माहिती (नाव, संपर्क क्र, लाभाची रक्क्म)  जाहीर करण्यात यावी. प्रदीप जैस्वाल म्हणाले की काळी –पिवळी वाहने चालू करण्याीसंबंधित निर्णय घेण्याात यावा. आमदार संजय शिरसाठ व अंबादास दानवे म्हणाले की शहरातील रीक्षा चालकांना प्रवाशी वाहतुक करताना मर्यादा घालून दिलेली असतांनाही अनेक रिक्षाचालक नियम मोडून दोन पेक्षा जास्त प्रवासी बसवतात.  काही जिल्हयामध्ये टायपिंग सेंटरला परवानगी देण्याीत आली आहे. आपल्या जिल्ह‍यातही टायपिंग सेंटर चालू करण्या्बाबत निर्णय घेण्याात यावा. आमदार अतुल सावे म्हणाले की शासनाकडून  व्हेंटिलेटर्स देताना घाटी तसेच जिल्हा रुग्णा्लयास प्राधान्य देण्यात यावे, यासाठी सदरील रुग्णालयातील स्टाफची संख्याही आवश्यनकतेनुसार वाढवावी असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *