कोरोनाविरुद्ध उमरगा शिवसेनेचा जलद प्रतिसाद दल प्रत्यक्ष मैदानावर लढणार 

जलद प्रतिसाद दल तपासणार ताप आणि ऑक्सिजन,औषधी घरपोच देणार  

उमरगा ,१५मे /नारायण गोस्वामी 

उमरगा – लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी अथवा मदतीकरिता दोन्ही तालुक्यातील  शिवसेच्या शाखा या  यापुढे शिवसेना जलद प्रतिसाद दल  (Shivsena Rapid Response Team ) म्हणून कार्य करणार असल्याची माहिती युवासेनेचे नेते किरण रवींद्र गायकवाड यांनी दिली . 


उमरगा – लोहारा तालुक्यातील   प्रत्येक गावा गावा मध्ये हे कार्य होणार आहे. ह्या अनुषंगाने  माडज, तुगाव, नाईचाकूर, भगतवाडी, मोघा या ठिकाणी शिवसेना रॅपिड रिस्पॉन्स टिम   कार्यरत झाल्या आहेत. या   शिवसेना रॅपिड रिस्पॉन्स टीम  (SS RRT) च्या माध्यमातून त्या त्या गावात घरोघरी जाऊन नागरिकांचे ताप  व ऑक्सिजन तपासणे , संशयित रूग्ण आढळ्यास त्यांना कोरोना चाचणी साठी केंद्रावर पाठवणे, होम क्वारंटाईन  रूग्ण आढळ्यास त्यांना घरपोच औषधी पोचवणे, कोरोना बद्दल व लसीकरणा बद्दल जनजागृती  करणे आदी सेवा दिली जाईल. 
गावातील कोरोना रूग्नांना शिवसेनेच्या टीम मार्फत रुग्णवाहिकाची सेवा देण्यात येणार आहे. सध्या उमरगा, मुरूम व लोहारा येथे शिवसेनेच्या माध्यमातून ३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत .आयसोलेशन सेंटर्स व होम क्वारांटाईन रुग्नाला गरज भासल्यास योग्य त्या रूग्णालयात बेड मिळवून देणे. आपले गाव, वॅार्ड सॅनिटाईझ करून घेणे. हे उपक्रम राबवले जातील. 
जहागीर आष्टा, जहागीर  चिंचोली, हिप्परगा, सुंदरवाडी, महालिंगरायवाडी, बेडगा, आलूर, कानेगाव, नागूर, खेड, रेबे चिंचोली, राजेगाव, हाराळी, उदतपुर, तावशीगड, एकोंडी, कोंजीगड, माकणी, धानुरी, कोराळ, कवठा, बेळंब, कोथळी, कोळसुर, जगदाळवाडी, ज. आष्टा, गुरूवाडी, मळगी, मळगीवाडी, दगड धानोरा, एकोंडी, नागराळ, पळसगाव, होळी, गुगळगाव, केसरजवळगा, बाबळसूर, सांगवी, चंडकाळ आणि मानेगोपाळ  या  गावा मध्ये ही  सेवा  टीमच्या माध्यमातून राबविली  जाणार आहे.
शिवाय उमरगा, तुरोरी, डिग्गी खसगी, नारंगवाडी, येनेगुर, जेवळी ला शिवसेनेच्या माध्यमातून कोविड  आयसोलेशन सेंटर्स ,संबंधित गावातील ग्राम पंचायत च्या सहकार्याने तयार आहेत . मागणीनुसार लवकरच अचलेर, कासार आष्टा, सास्तूर कानेगाव व केसरजवळगा मध्ये आयसोलेशन सेंटर्स सुरू होणार आहेत. 
ज्या लोकांना होम आयसोलेशनची अडचण आहे त्या लोकांनी, त्या त्या भागातील सेंटर्स मध्ये राहून उपचार घेऊ शकतील .उर्वरित गावातही संपर्क करून हे कार्य करण्यात येणार आहे. अशी माहिती युवा सेनाचे  किरण रविंद्र गायकवाड यांनी दिली.