बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने रचला इतिहास,भारताची सुवर्ण कामगिरी

इंटरनेट कनेक्शनअभावी भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी

मुंबई : ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम सामन्यात भारत संयुक्त विजेता बनला आहे. या अंतिम सामन्यात भारतासह रशियाचीही संयुक्तपणे निवड झाली आहे.  वास्तविक, इंटरनेट कनेक्शनअभावी भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले आहेत.फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं रविवारी पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला.

Chess Olympiad: R Praggananandhaa stars as India storm into quarter-finals

रविवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने इतिहास रचला आहे. ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत पहिल्यांदा विजेता ठरला आहे. रशियासह भारताला संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले आहे. वास्तविक, रशियाविरुद्ध खेळला जाणारा अंतिम सामना इंटरनेट कनेक्शनमुळे पूर्ण होऊ शकला नाही. ज्यामुळे भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDE ने प्रथमच ऑनलाईन स्वरूपात ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. यावेळी, भारतीय संघात कर्णधार विदित गुजराती, माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, डी हरिका, आर प्रगगनानंद, पी हरीकृष्ण, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी रशियाविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

Image

फिडे अध्यक्ष अर्काडी डोवोरकोविच यांनी दोन्ही संघ भारत आणि रशियाला फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचा विजेता घोषीत करीत दोघांना सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यानंतर भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद यांनी ट्विट केलं, “आम्ही चॅम्पियन आहोत, रशियाचं अभिनंदन!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी अभिनंदन करताना म्हटलं की, बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकल्याबद्दल आमच्या बुद्धिबळपटूंचे अभिनंदन. त्यांचे परिश्रम आणि समर्पण कौतुकास्पद आहे. त्याचे यश इतर बुद्धीबळ खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देईल. मला रशियन संघाचे ही अभिनंदन करतो.

इंटरनेट कनेक्शनमुळे फिडच्या अध्यक्षांनी भारत आणि रशिया या दोन्ही संघांना विजेते घोषित करत सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला. बुद्धीबळ ऑलिम्पियाड इतिहासात भारत पहिल्यांदा विजेता ठरला आहे. रशिया मात्र याआधी अनेक वेळा बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा विजेता बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *