औरंगाबादेत सर्वाधित ३७९ कोरोनाबाधित, 6 बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 5499 कोरोनामुक्त, 3575 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 15 : जिल्ह्यातील 124 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 9228 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5355 बरे झाले, 368 जणांचा मृत्यू झाला. तर 3505 जणांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३७९ नवे बाधित आढळून आले. यामध्ये शहरातील २९४, तर ग्रामीण भागातील ८५ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९४४४ झाली आहे. त्याचवेळी आतापर्यंत ५४९९ बाधित हे करोनामुक्त झाले असून, ३५७५ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत ३७० बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

घाटीत चिकलठाणा, पॉवर लूम येथील 45 वर्षीय पुरूष, घाटी परिसरातील 70 वर्षीय पुरूष, हिलाल कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगरातील 59 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घाटीत अंगुरीबाग येथील 53 वर्षीय पुरूष, खासगी रुग्णालयातील 63 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यातील ३७९ नव्या बाधितांमध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या १२५ बाधितांचा समावेश आहे. या १२५ बाधितांपैकी २५ बाधित सिटी एंट्री पॉइंटवर, ८७ बाधित मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाला आढळले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *