जालना जिल्ह्यात 81 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

34 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 27 (जिमाका) :- जालना शहरातील एकुण 51 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 30 अशा एकुण 81 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9912असुन सध्या रुग्णालयात -211 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3702, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या -284,एवढी तरकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-31643 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 81(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4370 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-26877, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 296, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3136
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3300 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -38 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-274,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -211,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 48,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-34 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3078, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या – 1162 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-50104तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 130 एवढी आहे.

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात भारज ता. जाफ्राबाद येथील 84 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 23 नागरीकांकडून 4 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 328 नागरिकांकडुन 9 लाख 20 हजार 260 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *