औरंगाबाद जिल्ह्यात 91 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 22 कोरोनामुक्त, 671 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद ,२९जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 124 जणांना (मनपा 31, ग्रामीण 93) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 22 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 91 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 118 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 425 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 671 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
*मनपा (09)*घाटी 3, क्रांतीनगर 1, ढोपळेस टॉवर 1, आझाद चौक 1, मन्सुर कॉलनी 1, हर्सूल 1,अन्य 01 
*ग्रामीण (82)*पानगाव खंडाळा 1, अन्य 81
 *मृत्यू (03)**घाटी (02)* 1. स्त्री/51/अन्सार कॉलनी, पडेगाव, औरंगाबाद2. स्त्री/60/ पैठण *खासगी रुग्णालय (01)* 1. स्त्री/55/म्हाडा कॉलनी, औरंगाबाद