औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 586 कोरोनामुक्त, 291 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,३० जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 09, ग्रामीण 27) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 586 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 372 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 495 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 291 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (12) घाटी परिसर 1, मिलिंद नगर 1, बीड बायपास परिसर 3, बालकिशन नगर 2, मुकुंदवाडी 1, अन्य 4

ग्रामीण (16) शेंद्रा एम.आय.डी.सी. 1, ता.गंगापूर 1, बजाज नगर 1, अन्य 13

मृत्यू (05)

घाटी (03) 1.65 स्त्री, लोणी ता.वैजापूर2.45 पुरुष, गंगळवाडी, ता.पैठण3.66 पुरुष, बालाजी नगर ता.सिल्लोड

खासगी (02) 1.55 पुरुष, बालानगर ता.पैठण2.37 पुरुष, पिंपळगाव ता.सिल्लोड