औरंगाबाद जिल्ह्यात 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 924 कोरोनामुक्त, 335 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, ११ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 91 जणांना (मनपा 16, ग्रामीण 75) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 717 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 458 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 335 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (11)
गजानन मंदिर 1, खडकेश्वर परिसर 1, एस टी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, अन्य 7
ग्रामीण (22)
औरंगाबाद 2, फुलंब्री 2, गंगापूर 1, कन्नड 1, खुलताबाद 2, वैजापूर 5, पैठण 9
मृत्यू (02)
घाटी (02) 1. 55, पुरुष, टाकळी वैद्य, औरंगाबाद2.58, स्त्री, बिडकीन, पैठण