औरंगाबाद जिल्ह्यात 91 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

जिल्ह्यात 43045 कोरोनामुक्त, 563 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 18 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 58 जणांना (मनपा 46, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43045 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 91 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44789 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1181 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 563 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (81) न्यायमुर्ती नगर (1), उत्तरनगरी चिकलठाणा (1), आचल अपार्टमेंट (1), उस्मानपुरा (2), ठाकरे नगर सिडको (2), पुजा अपार्टमेंट (1), भाग्य नगर (1), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), टाऊन सेंटर, सिडको एमजीएम हॉस्पिटलजवळ (1), एमआयडीसी चिकलठाणा (1), हडको (1), सुवर्णा नगर (1), एन 7 सिडको (4), पैठण रोड (1), अलोक नगर (2), संघर्ष नगर मुकुंदवाडी (1), त्रिमूर्ती चौक (1), गुरुदत्त नगर (1), पोलीस स्टेशन एन -7 (1), पोलीस कॉलनी (1), कासलीवाल तारांगण , पडेगाव (1), सिडको एन -3 (1),सिंधी कॉलनी (1), तुकोबा नगर (1), एन-2 सिडको (1), सेवन हिल परिसर(1), पीएफ ऑफिस परिसर (2), विष्णू नगर (1), एन सात सिडको (1), एन नऊ शिवाजी नगर (1), श्रेय नगर (1), गारखेडा परिसर (1), हिमायत बाग (1), अन्य (41)

ग्रामीण (10) चितेगाव (1), लासूर स्टेशन, गंगापूर (2), अन्य (7)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील 75 वर्षीय पुरूष, नादरपूर येथील 80 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात 66 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.